ब्रिंदा करात
महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दुसर्याच दिवशी, गांधी हत्येशी संबंध जोडलेल्या संघटनेच्या नेत्याचे भाषण प्रसारित व्हावे आणि तेही आपले राष्ट्रीय प्रसारण दूरदर्शन च्या सौजन्याने, हे काळाचं उलटं माहीमच म्हणावे लगेल. राष्ट्रीय संस्थेचा वापर अशा संघटनेची विचारधारा आणि नेतृत्व यांच्या प्रचारासाठी केला जाणे हा एक अशुभ संकेतच म्हणावा लागेल.
ह्या संदर्भात हे भाषण प्रसारणायोग्य होते असे दूरदर्शनने दिले गेलेले स्पष्टीकरण संपूर्णपणे अनुचित आहे. विजय दशमीच्या औचित्याने दिले गेलेले भाषण , कि जो या संघटनेचा स्थापना दिन म्हणूनहि साजरा केला जातो; दैनिक वृत्तपत्रात किंवा एखाद्या समाचार वाहिनीवर दिले जाणे समजण्यासारखे आहे, पण थेट प्रक्षेपण? सावध व्हा. हे त्या काळात ही झाले नाही जेव्हा दूरदर्शन ची स्थापना झाली होती, मग असं काय खास होतं कि ह्याचे प्रसारण २०१४ मध्ये व्हावे ? फरक एवढाच आहे कि आता एक प्रचारक आपले पंतप्रधान आहेत.
कोणी घेतला असा निर्णय? सर्वांनाच ठाऊक आहे की प्रसारभारती ही एक स्वायत्त संस्था आहे आणि तिला या निर्णयाची काहीच कल्पना नव्हती! माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील काही भेकड अधिकाऱ्यांकडूनथेट प्रक्षेपणाचे आदेश दिले गेले आणि दूरदर्शन च्या निदेशाकांनी, जणू प्रक्षेपण केल्या जाणाऱ्या स्वयंसेवकांसारखी, ही कामगिरी अगदी तत्परतेने बजावली. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शन च्या बातमी विभागाच्या डिरेक्टर जनरल यांची नियुक्ती प्रसार भरतीशी सल्लामसलती शिवाय परस्पर केली गेली. जेंव्हा बातमी विभागाचे प्रमुखच स्वतःच्या नियुक्तीकरता सरकारचे आधीन आहेत तर मग कसली स्वतंत्रता आणि कसले काय? त्यांच्या पैकी कोणी तरी सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करू शकणार होते का?
कॉंग्रेसच्या कारकीर्दीत एक काळ असा होता, जेंव्हा दूरदर्शन ची वायू लहरी माध्यमामध्ये मक्तेदारी होती, आणि त्या काळी दूरदर्शन चा “हिज/हर मास्टर्स व्होइस” म्हणजेच सत्ताधीशांचा आवाज असा उल्लेख व्ह्यायचा. तेव्हा दूरदर्शनवर केवळ सरकार आणि सत्तेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांचेच प्रक्षेपण होते अशी तक्रार असायची. पण सद्य परिस्थितीत म्हणजेच मोदींच्या कारकिर्दीत दूरदर्शनने एक पाउल पुढे टाकलेलं दिसत आहे, सरकारचे नव्हे तर, विपक्षाच्या विरोधाला न जुमानता, एका असंवैधानिक पक्षाचे दूरदर्शन वर प्रक्षेपण केले गेले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना एक स्वयंघोषित सांप्रदायिक संघटना आहे, जी तमाम भारतीयांचे नाही तर केवळ एका घटकाचे – हिंदूंचे प्रतिनिधित्व करते. ह्या संघटनेला दोन वेळा बंदी घालण्यात आली आहे तसेच सांप्रदायिक हिंसेच्या अनेक घटनांमध्ये ह्या संघटनेची चौकशी होऊन तिला दोषी ठरवण्यात आले आहे. नुकतेच, संघटनेच्या नेत्यांनी व समर्थकांनी तथाकथित “लव जिहाद” या नावाखाली मुसलमानांच्या विरोधात विष पेरण्याचे अतिशय सांप्रदायिक काम केले.
अशा संघटनेच्या नेत्याच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण म्हणजे भारताच्या धर्म निरपेक्षतेच्या मूळ तत्वांवरच घाव घालण्या सारखे आहे. आपण अश्या घटकांचे का ऐकावे? तसेच अश्या घटनांमुळे इतर सांप्रदायिक संघटना, आणि ढोंगी ‘बाबा’ व ‘माता’ यांच्या कडूनही राष्ट्रीय वाहिनींवर प्रक्षेपणाची ची मागणी केली जाऊ शकते, त्याचे काय?
जेव्हा भारतीय निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त असलेले राजकीय पक्ष आपआपल्या पक्षाची माहिती दूरदर्शनवर प्रक्षेपित करतात तेव्हा त्या माहितीची/ भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शनच्या अधिकार्यांकडे दिली गेली जाते व दूरदर्शन चे अधिकारी ती माहिती पडताळून पाहतात आणि जर त्यात निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध काही लिखाण आढळले तर, त्यातील काही वाक्य किंवा परिच्छेद बादही करू शकतात. लक्षात घ्या की ही परिस्थिती निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त असलेल्या राजकीय पक्षांची आहे – ह्या पक्षांच्या नेत्यांनाही थेट आणि उस्फुर्त भाषण करण्यास अनुमती नाही. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणाची लिखित प्रत दूरदर्शन कडे दिली होती का? निश्चितच नाही. तसे करण्याची त्यांना गरजही वाटली नाही कारण ते ‘मोदीं’च्या भारतात आहेत. इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कायद्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे आणि त्याला विशेषाधिकार बहाल केले गेले आहेत.
अश्या भाषणाचे थेट प्रक्षेपण म्हणजे अश्या विचारांचे प्रक्षेपण ज्यांचे भारताच्या धर्मनिरपेक्ष समाजात काहीही स्थान नाही. दूरदर्शनचा वापर इतिहास आणि संस्कृतीच्या अशा विकृत कल्पनेसाठी व्हावा हे लांच्छनस्पद आहे. सदर भाषणामध्ये हिंदुत्व हा भारताचा मूळ गाभा असल्याचे अनेक संदर्भ होते. भागवतांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले की, “आमच्यासाठी सर्वसमावेशक सत्य म्हणजेच हिंदू धर्म आहे आणि हीच आमची राष्ट्रीय ओळख आहे”, त्याही पुढे जाऊन, “अतूट अशी राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच हिंदुत्व होय” असेही सांगितले.
कोणत्याही धर्मनिरपेक्ष देशाची राष्ट्रीय ओळख कोणत्याही धर्माने होऊच शकत नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार, आंबेडकर यांनी, हिंदुत्वाला नाकारले व बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि ह्या विषयी एक अतिशय निपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ असे लेखन ही करून ठेवले आहे. तर मग आंबेडकर आणि ज्यांनी हिंदू सांप्रदायिकतेचे प्रतीक होते अश्या गोळवलकर ह्यांचा उल्लेख एका वाक्यात व्हावा ह्या पेक्षा घृणास्पद गोष्ट दुसरी काय असू शकते?
भागवत यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवकाचा उल्लेख “हिंदू राष्ट्रीय भावनेने प्रेप्रेरीत झालेले कामगार” असा केला आहे. अशा प्रकारचा सांप्रदायिक विचारांचे प्रक्षेपण राष्ट्रीय प्रसारण वाहिनी आता करणार आहे का? जर हिंदू ही भारताची राष्ट्रीय ओळख असणार असेल तर मग मुस्लिम राष्ट्रीय ओळख, ख्रिश्चन राष्ट्रीय ओळख का नाही? आणि असे असेल तर मग भारताच्या राष्ट्रीय ओळखी चे काय?
ह्या संदर्भात माहिती व प्रसारण मंत्रालयाला जाब द्यावा लागेल.