लक्ष्य आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था- गेल्या १० वर्षात अन्नधान्याचे भाव सातत्याने वाढत आहेत. आदिवासी भागात कुपोषणामुळे बालमृत्यूच्या घटना वारंवार होत आहेत, ५८% गरोदर स्त्रियांमध्ये रक्ताची कमतरता आहे. ३ वर्षांखालील ४२% बालके कमी वजनाची शिकार आहेत. अशा परिस्थितीत सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करण्याला प्राधान्य देऊन लोकांना दिलासा द्यावा ही अपेक्षा काही चुकीची नाही. तमील नाडू, […]